कोल्हापूर, (जि.मा.का.) दि. 1 पाव्हणं
जरा जपून एड्स आला लपून, एड्स जाणा एड्स टाळा, लग्नाची कुंडली पाहण्याआधी आरोग्याची
कुंडली पहा, अशा घोषणा देत जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा आरोग्य विभाग जिल्हा
एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक यांच्या माध्यमातून आज प्रभात फेरी काढण्यात आली
छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ
कलशेट्टी, जि.पचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल जिल्हा शल्यचित्सक डॉ. बी. सी.
केम्पी पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये अभिनेते आनंद काळे आदींनी झेंडा दाखवून या प्रभातफेरीला सुरवात करण्यात आली
जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी डॉ कलशेट्टी म्हणाले एड्स जनजागृती मोठ्या प्रमाणात केली पाहिजे. एच आय व्ही
संसर्गितांना धिर दिला पाहिजे. श्री. मित्तल यांनी यावेळी जनजागृती आणि प्रबोधन करण्याबाबत
आवाहन केले. अभिनेते श्री. काळे यांनीही मनोगत व्यक्त केले.
यानंतर जनजागृतीपर घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली. सुरवातीला
डॉ प्रियांका रेड्डी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. या प्रभात फेरीत डॉ विलास देशमुख,
डॉ. राजेश पवार, डॉ. हर्षला वेदक,डॉ. सुप्रिया देशमुख यांच्यासह एनएसएस, एससीसी,महाविद्यालयीन
विद्यार्थी मोठ्या संख्येने होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.