बुधवार, ४ डिसेंबर, २०१९

ग्रामपंचायत निवडणूक मतदानासाठी स्थानिक सुट्टी



कोल्हापूर, दि. 4 (जि.मा.का.) :  शिरोळ तालुक्यातील दत्तवाड, घोसरवाड, हेरवाड, टाकळी, टाकळवाडी, जुने दानवाड, नवे दानवाड, राजापूर, राजापूरवाडी आणि खिद्रापूर या निवडणूक होऊ घातलेल्या गावातील शाळा, महाविद्यालये, शासकीय/ निमशासकीय कार्यालये, दुकाने आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना कामगारांना भरपगारी मतदानांच्या दिवशी गुरूवार दि. 12 डिसेंबर रोजी स्थानिक सुटी जाहीर केली असल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई  यांनी कळविले आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.