मंगळवार, ३ डिसेंबर, २०१९

ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम जाहीर



कोल्हापूर, दि. 3 (जि.मा.का.) : माहे जुलै ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम जाहीर झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
       प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यासाठी- तहसिलदार यांनी गुगलमॅपवर MRSAC चे नकाशे super impose करून प्रत्येक गावाचे नकाशे अंतिम करणे शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2019. संबंधित तलाठी व ग्रामसेवक यांनी संयुक्त स्थळ पाहणी करून प्रभाग पाडणे, सीमा निश्चित करणे व अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे आरक्षण निश्चित करणे सोमवार दिनांक 30 डिसेंबर 2019. तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रारूप प्रभाग रचनेला मान्यता देणे व सर्व सदस्यांनी स्वाक्षरी करणे शुक्रवार दिनांक 10 जानेवारी 2020. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नमुना-ब (प्रारूप प्रभाग रचना व आरक्षण) प्रसिध्द करण्यापूर्वी तहसिल कार्यालयाकडून असे प्रस्ताव प्राप्त करून त्याची संक्षिप्त प्राथमिक तपासणी करणे व त्यात आवश्यक असल्यास दुरूस्त्या करणे सोमवार दिनांक 20 जानेवारी 2020. या दुरूस्त्या अंतर्भूत करून प्रारूप प्रभाग रचना व आरक्षणाला (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसह) तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता द्यावी व समितीच्या सर्व सदस्यांनी स्वाक्षरी करावी गुरूवार दिनांक 30 जानेवारी 2020. विशेष ग्रामसभेची सूचना देणे (आरक्षणाची सोडत काढण्यासाठी) शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी 2020. विशेष ग्रामसभा बोलवून, तहसिलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली, प्रारूप प्रभाग रचनेवर आरक्षणाची सोडत (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसह) काढणे मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी 2020.
          प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागविणे- प्रारूप प्रभाग रचनेला (नमुना ब) व्यापक प्रसिध्दी देवून तहसिलदार यांनी हरकती व सूचना मागविण्यासाठी जाहीर सूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक 7 फेब्रुवारी 2020 शुक्रवार. प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती सादर करण्याचा दिनांक 14 फेब्रुवारी 2020 शुक्रवार. प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सूचना सुनावणीसाठी उप विभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करणे गुरूवार दिनांक 20 फेब्रुवारी 2020. प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सूचनांवर उप विभागीय यांनी सुनावाणी घेणे शनिवार दिनांक 29 फेब्रुवारी 2020. आलेल्या प्रत्येक हरकती व सूचनांवर सुनावणी नंतर अभिप्रायासह अंतिम निर्णयासाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करणे बुधवार दिनांक 11 मार्च 2020.
          प्रारूप रचना अंतिम करणे- उप विभागीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले प्रस्ताव तपासून जिल्हाधिकारी यांनी प्रभाग रचना व आरक्षणाला अंतिम मान्यता देणे व स्वाक्षरी करणे मंगळवार दिनांक 17 मार्च 2020. जिल्हाधिकारी यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचनेला  (नमुना अ मध्ये) व्यापक प्रसिध्दी देणे शनिवार दिनांक 21 मार्च 2020.
         


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.