मंगळवार, १० डिसेंबर, २०१९

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करावे -निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे



कोल्हापूर, दि. 10 (जि.मा.का.) : प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेसाठी ग्रामपंचायतमधील नागरिक सेवा केंद्रांवर जावून शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणिकरण करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी केले आहे.
      
          आधार प्रमाणिकारणासाठी नागरिक सेवा केंद्र समन्वयक  यांनी सर्व केंद्राशी समन्वय साधून त्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात. आधारक्रमांक मध्ये दुरूस्ती आल्यास CSC केंद्रामध्ये ही दुरूस्ती केली जाऊ शकते. दुरूस्तीसाठी आधार कार्ड बँक पासबुकची छायांकित प्रत केंद्रावर नेणे आवश्यक राहील.
           नवीन डेटा एंट्री केलेल्या शेतकऱ्यांकडून त्यांचे आधारकार्ड, बँक पासबुक व 7/12 च्या छायांकित प्रती ॲप्रुव्हलसाठी तहसिल कार्यालयात जमा करावीत. यापूर्वी डेटा एंट्री केलेल्या शेतकऱ्यांची गावनिहाय माहिती CSC केंद्राने माहितीसाठी उपलब्ध करून द्यावी.  पेन्डींग करेक्शन दुरूस्तीसाठी बल्क अपलोडींगची सुविधा देण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात दुरूस्ती करून डेटा प्राप्त झालेला असल्यास व एक -एक दुरूस्तीसाठी वेळ लागणार असल्यास या  सुविधेचा वापर करावा.
          प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत नवीन लाभार्थी नोंदणीकरिता शासनामार्फत 15 रूपये आधार क्रमांक दुरूस्ती असल्यास 10 रूपये इतकी रक्कम ठरवून दिली आहे. नागरिक सेवा केंद्र चालकांकडून जादा फी आकारणी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही श्री. गलांडे यांनी सर्व तहसिलदारांना पत्र देवून कळविले आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.