रविवार, १ डिसेंबर, २०१९

छत्रपती शिवाजी पदभ्रमण मोहिमेसाठी शेवटची तुकडी रवाना छत्रपती शिवाजी महाराजांची जलनिती आजही उपयुक्त - महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी



                               



                कोल्हापूर दि. 1 (जि.मा.का.) :  छत्रपती शिवाजी महाराजांची जलनिती आजही शिवकालीन पाणी साठवण योजनेच्या नावाने उपयुक्त आहे. त्यांच्या पर्यावरण आणि जलनितीवर भविष्यातही उपयुक्त काम करुया, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले.
        छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय जोशपूर्ण आवाजात घोषणा देत राष्ट्रीय छात्र सैनिकांची  आज शेवटची चौथी तुकडी शिवाजी पदभ्रमण मोहिमेसाठी रवाना झाली. महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी,निवृत्त मेजर जनरल एम.के. काशित विशेष सेवा मेडल, क्रीडा उपसंचालक माणिक ठोसरे, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे, सायबर महाविद्यालयाचे प्रा. दिपक भोसले,  ग्रुप कमांडर ब्रिगेडीयर आर. बी. डोग्रा यांनी या तुकडीला ध्वज दाखविला.
            सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. कर्नल आर. बी. होला यांनी शिवाजी पदभ्रमण मोहिमेचे उद्दिष्ट सांगून पदभ्रमण मार्गाची माहिती आणि इतिहास सांगितला. ते म्हणाले, सुमारे 360 वर्षापूर्वी नोव्हेंबर 1669 मध्ये पन्हाळागड स्वराज्यामध्ये
महाराजांनी दाखल केला.
            डॉ. कलशेट्टी पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे असणारी ही   पदभ्रमण मोहीम प्रेरणादायी आहे. महाराजांची जलनिती आजही उपयुक्त आहे. याच प्रेरणेवर आपण काम करीत आहोत.भविष्यातही आपल्या सर्वांना काम करायचे आहे. या पदभ्रमण मोहिमेत सहभागी झाल्याबद्दल  तुम्ही सर्वजण भाग्यवान आहात.  निवृत्त मेजर जनरल श्री. काशिद यांनीही यावेळी शुभेच्छा दिल्या.
             एन. सी. सी. गीतानंतर उपस्थित मान्यवरांनी ध्वज दाखवून तुकडीला रवाना केले. छत्रपतींच्या आणि भारत मातेच्या जयघोषात ही तुकडी मार्गस्थ झाली. आजच्या या तुकडीत राज्यातील पुणे,नागपूर  तसेच देशातील तामिळनाडू आणि उत्तरप्रदेशमधील छात्रांचा सहभाग आहे. यावेळी कर्नल राजेशकुमार, कर्नल राजेश शहा, कर्नल के.के. मोरे, कर्नल एम.के. तिवारी, लेप्टनंट कर्नल सुनील नायर आदी उपस्थित होते.
000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.