मंगळवार, ३ डिसेंबर, २०१९

हयातीचे दाखले ऑनलाईन पध्दतीने पाठविण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याणशी संपर्क साधावा



           कोल्हापूर, दि. 3 (जि.मा.का.) : जिल्हयातील माजी सैनिक, विधवांना चरितार्थ मदत मिळत आहे, त्यांनी आपले अनुदान कायम करण्याकरिता 28 फेब्रुवारी 2020 पर्यंत आपले हयातीचे दाखले ऑनलाईन पध्दतीने केंद्रीय सैनिक बोर्डला पाठवण्याकरिता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष सासणे यांनी केले आहे.
       श्री. सासणे म्हणाले, जिल्हयातील माजी सैनिक, विधवांना आपले हयातीचे दाखले वेळेत सादर करावेत, अन्यथा अनुदान बंद झाल्यास आपण स्वत: जबाबदार राहाल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.