सोमवार, १६ डिसेंबर, २०१९

उंबरवाडीचे जवान जोतीबा चौगुले शहीद ; आज अंत्यसंस्कार




       कोल्हापूर, दि. 16  (जि.मा.का.) : गडहिंग्लज तालुक्यातील उंबरवाडी येथील जवान हवालदार जोतीबा गणपती चौगुले (वय 37) हे शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या त्यांच्या गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त मेजर सुभाष सासणे यांनी दिली.
       शहीद जवान चौगुले यांचा 23 सप्टेंबर 1982 रोजी जन्म झाला होता. 5 एप्रिल 2002 रोजी ते सैन्यात भरती झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी यशोदा, मुलगा अथर्व ( वय 9) मुलगा हर्षद (वय 3) असा परिवार आहे. उद्या त्यांचे पार्थिव येणार असून, त्यांच्या गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.