शुक्रवार, ६ डिसेंबर, २०१९

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कागल शासकीय वसतिगृहात अभिवादन


कोल्हापूर,दि. 6 (जि.मा.का.) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कागल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृहाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते गैबी चौक मार्गावर कॅन्डल मार्च रॅली काढून अभिवादन करण्यात आले.
       यावेळी पोलीस उपनिरीक्षक निखील कर्चे, दीपक कांबळे, वसतिगृहाचे गृहपाल संजय जाधव, गौतम कांबळे, संदीप बल्लाळ, विशाल बल्लाळ, किरण साठे, वसतिगृहाचे विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते. साहिल गोरंबेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सामाजिक कार्यकर्ते तुषार भास्कर, सुदर्शन कानडे यांनी मनोगत व्यक्त केले. वसतीगृहाचे अध्यक्ष अनिकेत कांबळे यांनी आभार मानले.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.