बुधवार, ४ डिसेंबर, २०१९

वडणगे येथे संविधान साक्षर ग्राम उपक्रमात महिला बचतगटाच्या योजनांची माहिती





कोल्हापूर दि. 4 (जि.मा.का.) :  संविधान दिनाचे औचित्य साधून करवीर तालुक्यातील वडणगे येथे संविधान साक्षर ग्राम उपक्रमाव्दारे गावांतील महिलांना बचत गटासाठीच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.
           पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्यावतीने (बार्टी) संविधान दिनाचे औचित्य साधून 26 नोव्हेंबर ते 25 डिसेंबर  या कालावधीमध्ये संविधान साक्षर ग्राम हा उपक्रम राबविण्यात येत आहे.  वडणगे येथे या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. महिलांच्या विकासासाठी बचत गटांच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जातात, या योजनांची माहिती शीला पाटील यांनी  दिली. जिल्हा समन्वयक आशा रावण यांनी बार्टीच्या उपक्रमांची माहिती दिली.
           कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आली. कार्यक्रमास सरपंच सचिन चौगुले, उपसरपंच दीपक व्हरगे, ग्रामसेवक प्रकाश बागुल, लिपिक प्रकाश चौगुले, रणरागिनीच्या अध्यक्ष शीला पाटील, ग्रामपंचायत सदस्य, महिला, ग्रामस्थ उपस्थित होते. 
          कार्यक्रमाचे आभार प्रतिभा सावंत यांनी मानले. गावातील महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.
           
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.