कोल्हापूर, दि. 10 (जि.मा.का.) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा
अधिकारी कार्यालयाच्यावतीने फिट इंडिया मुवमेंट अंतर्गत गो-गर्ल-गो योजनेचे दिनांक
12 ते 18 डिसेंबरपर्यंत आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर
साखरे यांनी दिली.
या
योजनेंतर्गत मुलींना क्रीडा विषयक सुविधा, मोकळे वातावरण, अधिकाधिक कौशल्य दाखविण्याची
संधी, मुलींच्या आरोग्याच्या योग्य सवयी तसेच न्युट्रीशनबाबत माहिती, मुली व महिलांमधील
रक्ताच्या कमतरतेबाबतची माहिती, स्वच्छतेबाबत योग्य सवयी, मुलींना सशक्त व निरोगी बनविण्यासाठी
संपूर्ण महाराष्ट्रात गो-गर्ल-गो मोहीम राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व जिल्हा
परिषद, माध्यमिक शाळांनी आपल्या स्तरावर 6 ते 14 वयोगटातील मुलींसाठी पारंपरिक क्रीडा
प्रकार (मंगळागौरीचे खेळ), फुटबॉल, योगा, दोरी उड्या. वयोगटानुसार धावणे. 6 ते 8 वर्षासाठी
50 मी. धावणे, 9 ते 11 वर्षासाठी 100 मी. धावणे व 12 ते 14 वर्षासाठी 100 मी. धावणे
या स्पर्धांचे आयोजन करून 2 फोटो व स्पर्धा आयोजनाचा अहवाल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात
ई-मेल वर पाठवावा, असे आवाहनही श्री. साखरे यांनी केले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.