इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, २३ डिसेंबर, २०१९

जिल्हा समाज कल्याणमार्फत मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृती



                      
कोल्हापूर, दि. 23 (जि.मा.का.) : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत इयत्ता 5 वी ते 7 वी व इयत्ता 8 वी ते 10 वी मध्ये शिकत असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी दिली.
       ही योजना राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा व इतर शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणाऱ्या इतर मागासप्रवर्गातील इयत्ता 5 वी ते 7 वी व इयत्ता 8 वी ते 10 वी मध्ये शिकत असणाऱ्या मुलींना लागू राहील. योजनेसाठी उत्पन्नाची अट लागू राहणार नाही. इयत्ता 5 वी ते 7 वी मध्ये शिकत असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील मुलींसाठी दरमहा 60 रूपये प्रमाणे 10 महिन्यांकरिता 600 रूपये इतका लाभ देय राहील. इयत्ता 8 वी ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या मुलींसाठी दरमहा 100 रूपये प्रमाणे 10 महिन्यांकरिता 1 हजार रूपये इतका लाभ देय राहील.
          या योजनेचा लाभ मिळण्यासाठी सर्व शाळांनी विद्यार्थीनींचे प्रस्ताव आवश्यक त्या माहितीसह जिल्हा समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या तालुका कॅम्पच्या ठिकाणी जमा करावेत, असे आवाहनही श्री. घाटे यांनी केले आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.