कोल्हापूर,दि. 6 (जि.मा.का.) : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील
रिक्त पदांच्या पोट निवडणूक कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद कोल्हापूर मधील 28-दत्तवाड
निवडणूक विभाग रिक्त पदांच्या पोट निवडणुकीकरिता मतदान गुरूवार दिनांक 12 डिसेंबर रोजी
सकाळी 7.30 ते सायं. 5.30 वाजेपर्यंत होत आहे. या दिवशी
मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनी ऐवजी मधल्या बोटाला शाई लावण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी
दौलत देसाई यांनी दिली.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या
क्षेत्रामध्ये लोकसभा, विधानसभेची, स्थानिक स्वराज्य संस्थेची अथवा अन्य निवडणूक नुकतीच
पार पडलेली असेल व मतदान केलेल्या मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर न मिटणाऱ्या शाईची निशाणी मिटलेली नसेल त्यावेळी
त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक/ पोटनिवडणुकीमध्ये मतदाराच्या डाव्या
हाताच्या तर्जनीऐवजी मधल्या बोटाला शाई लावण्यात यावी. जर मधल्या बोटालादेखील शाईची
निशाणी असेल तर जिल्हाधिकारी / महानगरपालिका आयुक्त यांनी निवडणुकीमध्ये मतदाराच्या
कोणत्या बोटाला शाई लावण्यात येईल याबाबत आदेश काढावेत आणि त्यानुसार स्पष्ट सूचना
संबंधित सर्व मतदान केंद्राध्यक्षांना द्याव्यात, असे नमूद केले आहे.
याबाबत 28- दत्तवाड निवडणूक विभाग रिक्त पदांच्या पोट निवडणूक
कामी प्रशिक्षण दिवशी मतदान केंद्राध्यक्ष, अधिकारी व कर्मचारी यांनांही लेखी सूचना
द्याव्यात.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.