बुधवार, ४ डिसेंबर, २०१९

जैव विविधता नोंदवहीसाठी इच्छूकांनी संपर्क साधा - अमन मित्तल



कोल्हापूर, दि. 4 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जैव विविधता व्यवस्थापन समिती अंतर्गत लोक जैव विविधता नोंदवही तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे.  यासाठी इच्छुक स्वयंसेवी संस्थांनी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), उपवनसंरक्षक (प्रा), वनवर्धन प्रधान डाकघर कार्यालयासमोर ताराबाई पार्क येथे संपर्क साधावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केले आहे.
       जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जैव विविधता व्यवस्थापन समिती अंतर्गत लोक जैव विविधता नोंदवही तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्या अनुषंगाने जिल्हा तांत्रिक सहाय्य गटाची स्थापना करण्यासाठी मंगळवार दि. 10 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात पर्यावरण प्रेमींच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
          जिल्ह्यामधून कृषीशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आयुर्वेदशास्त्र, वन, वन्यजीव, पर्यावरण व जैव विविधता संबंधित तज्ञ व इच्छूक व्यतींनी आपल्या बायोडेटासह उपस्थित रहावे. ग्रामपंचायत स्तरावरील लोक जैव विविधता नोंदवही तयार करण्याकरिता जिल्ह्यातील ज्या स्वयंसेवी संस्थांकडे तज्ञ मनुष्यबळ उपलब्ध आहे, अशा इच्छुक स्वयंसेवी संस्थांनी आजवर केलेल्या कामाचे सादरीकरण करण्यासाठी उपस्थित रहावे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.