कोल्हापूर दि. 4 (जि.मा.का.) : महिलांवरील आत्याचारास प्रतिबंध करण्यासाठी
1091 ही हेल्पलाईन वाहनांच्या आत ठळकपणे 15 डिसेंबरपूर्वी प्रदर्शित करावी. ही कार्यवाही
पूर्ण केली का नाही याची तपासणी पोलीस आणि परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी करावी, असे
आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले. हैद्राबाद येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी हे
आदेश दिले आहेत.
ऑटोरिक्षा, टॅक्सी,
बस या प्रवासी वाहनांमध्ये महिलांवरील आत्याचारास प्रतिबंध करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश
चंद्रशेखर धर्माधिकारी समितीच्या 15 नोव्हेंबर 2014 रोजीच्या बैठकीतील सादरीकरणातील
सूचनांन्वये 1091 हा हेल्पलाईन क्रमांक लिहीण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
1091 हा हेल्पलाईन
क्रमांक ऑटोरिक्षा, टॅक्सी, स्कूलबस, एसटी बस, खासगी प्रवासी बसेस, मोटार कॅब आणि खासगी
प्रवासी वाहतूक वाहने आदी वाहनांच्या आतील भागावर वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना
दिसेल अशा ठिकाणी प्रदर्शित करणे बंधनकारक राहील. याबाबत पोलीस व परिवहन विभागातील
अधिकारी तपासणी करून खात्री करतील. 15 डिसेंबरपूर्वी याची अंमलबजावणी करावी, असे आदेश
जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी आज दिले आहेत.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.