कोल्हापूर
दि. 5 (जि.मा.का.) : जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय व मनपास्तरीय शालेय फिल्ड आर्चरी स्पर्धांचे आयोजन करण्यात
आले आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर
साखरे यांनी दिली.
या स्पर्धा दि. 8 डिसेंबर रोजी
यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, वारणा नगर येथे होणार आहेत. या स्पर्धांकरिता
14,17 व 19 वयोगटातील इ. 6 वी ते 12 वी मध्ये शिकणारे खेळाडू सहभागी होवू शकतात. इंडियन,
रिकर्व आणि कंपाउंड या तीन प्रकारामध्ये या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धेतील
विजयी खेळाडू विभाग-राज्य-राष्ट्रीय स्तराप्रमाणे पुढील स्पर्धेसाठी पात्र ठरतील. जास्तीत-जास्त
खेळाडूंनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने करण्यात
आले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.