गुरुवार, १ डिसेंबर, २०११

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचा डिसेंबर महिन्यातील जिल्हा दौरा

            कोल्हापूर दि. १ : कोल्हापूर जिल्ह्यातील माजी सैनिक, विधवा व अवलंबितांचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच कल्याण व पुनर्वसनाच्यादृष्टीने सवलतींची माहिती देण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी डिसेंबर २०११ मध्ये जिल्हा दौरा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कालावधीत ते विविध तालुक्यांना तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यास भेट देऊन सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांचे प्रश्नही जाणून घेणार आहेत.
             जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्या तालुकानिहाय दौर्‍याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असून आपल्या दौर्‍यात ते बहुतांश ठिकाणी तहसिलदार कार्यालयात संबंधितांची भेट घेतील. या व्यतिरिक्त स्थानांचा स्वतंत्र उल्लेख करण्यात आला आहे. दि. ८ व ९ डिसेंबर २०११ रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, ओरोस, सिंधुदुर्ग, दि. १३ डिसेंबर रोजी चंदगड, दि. १४ डिसेंबर रोजी गडहिंग्लज, दि. १५ डिसेंबर रोजी शाहुवाडी, दि. १६ डिसेंबर रोजी आजरा, दि. १६ डिसेबर रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, ओरोस, जि. सिंधुदुर्ग, २० डिसेंबर रोजी हातकणंगले, दि. २१ डिसेंबर रोजी भुदरगड, दि. २३ डिसेंबर रोजी शिरोळ, ३० व ३१ डिसेंबर रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, ओरोस, सिंधुदुर्ग असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे. सर्व दौ-यांची वेळ सकाळी ११ ते दुपारी ३ अशी असून सदर दिवशी शासकीय किंवा इतर सुट्‌टी असल्यास त्या तालुक्याचा दौरा पुढील महिन्यात घेण्यात येईल, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, कोल्हापूर यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.