इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, २८ डिसेंबर, २०११

स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीने वाढविण्याची प्रथा घराघरातून निर्माण होणे गरजेचे -- डॉ. सुनीलकुमार लवटे

        कोल्हापूर दि. २८ : स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीने वाढविण्याची प्रथा घराघरातून निर्माण होणे गरजेचे आहे. शैक्षणिक केंद्गे ही माणुसकी निर्माण करणारी केंद्गे असून स्त्री-पुरुष भाव साक्षरता निर्माण करण्यासाठी शिक्षणासाठी पुनर्बांधणी होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले.
      महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई पुरस्कृत विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर आणि  जिल्हा महिला व बालक विकास विभाग, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विवेकानंद महाविद्यालयात महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थींनीकरिता आयोजित केलेल्या प्रबोधन शिबीरात डॉ. लवटे बोलत होते.
      कायदेविषयक शिक्षणाचा अभ्यासक्रमात अंतर्भाव करावा असे प्रतिपादन स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे यांनी व्यक्त केले.
      लेक लाडकी अभियानच्या प्रवर्तक अ‍ॅड. वर्षा देशपांडे म्हणाल्या, चुकीचे वागणार्‍यांची ताकद आपल्या निष्क्रीयतेने वाढते. आपण सक्रिय राहिल्यास चुकीचे वागणारे वचकून राहतात. स्त्री-पुरुष दोघांनीही नीतीनियम पाळणे आवश्यक आहे. स्वयंशिस्त बिघडली की कायद्याची गरज भासते. त्यांनी महिलांविषयी असणारे सामाजिक कायदे, स्त्रीभ्रृण हत्या, मुलींचे घटते प्रमाण याविषयी मार्गदर्शन केले.
      समस्या या स्वनिर्मित असून भावनेचा निचरा होणे आवश्यक असते. यासाठी मानसिकता बदलली पाहिजे याची सुरुवात स्वतःपासून व्हावी, असे मार्गदर्शन डॉ. कालिंदी रानभरे यांनी केले.
      जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय माने यांनी प्रबोधन शिबीर आयोजनामागील भूमिका विषद केली. प्राचार्य डॉ. हिंदुराव पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करुन स्वागत केले. प्रा. लीलावती पाटील यांनी आभार मानले. सूत्रसंचलन कु. स्नेहल दुर्गुळे हिने केले.
      शिबीरास प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.