कोल्हापूर दि. ५ : जिल्हा कोषागार कार्यालय, कोल्हापूर यांच्यावतीने राज्य शासकीय सेवा निवृत्ती वेतनधारकांसाठी निवृत्ती वेतन / कुटुंब निवृत्ती वेतन व त्यांच्या अनुषंगिक कार्यवाहीबद्दल निवृत्ती वेतन धारकांचा मेळावा दि. ९ डिसेंबर २०११ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा मुख्याध्यापक संघ हॉल (जुने एसएससी बोर्ड), विक्रम हायस्कूल जवळ, मध्यवर्ती एस. टी. स्टँडच्या मागे, कोल्हापूर येथे घेण्यात येणार आहे. या मेळाव्यामध्ये प्रस्तावित असल्याप्रमाणे निवृत्ती वेतनविषयक लाभ देण्यासंबंधीच्या कार्यवाहीचा आढावा व इतर बाबींचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी या मेळाव्याचा सर्व संबंधितांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी, कोल्हापूर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.