कोल्हापूर दि. १ : जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्ग, कोल्हापूर यांच्यावतीने नुकताच स. म. लोहिया हायस्कूलमध्ये तांत्रिक व अतांत्रिक बेरोजगार उमेदवारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यामध्ये हातकणंगले, शिरोळ, कागल, करवीर तालुक्यातील १४ तर पुणे जिल्ह्यातील ५ अशा १९ खाजगी उद्योजकांनी सहभाग घेतला. रोजगार मेळाव्यास जिल्ह्यातील सुमारे ९०० बेरोजगार तरुण-तरुणी उपस्थित होत्या. विविध उद्योगांतील १२६३ रिक्तपदांसाठी ७५० मुलाखती दिलेल्या उमेदवारांपैकी ३०२ उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली.
मेळाव्यास उपस्थित असलेल्या ज्या बेरोजगार उमेदवारांकडे नोंदणी कार्ड नाही परंतु त्यास मुलाखत द्यावयाची असल्याने तो मुलाखतीपासून वंचित राहू नये म्हणून यावेळी बेरोजगार नाव नोंदणी अभियान उपक्रम राबवून मेळाव्यात १०४ उमेदवारांची नांव नोंदणी करुन त्यांना मुलाखतीची संधी देण्यात आली.
आय. टी. आय. असोसिएशन, कोल्हापूरचे सचिव ओंकार देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व दि न्यूᅠएज्युकेशन सोसायटीचे सचिव जी. एन. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली दिप प्रज्वलनाने रोजगार मेळाव्यास सुरुवात झाली. रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्गाचे सहाय्यक संचालक गं. अ. सांगडे यांनी प्रास्ताविकात रोजगार मेळाव्याची पार्श्वभूमी विषद केली. रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी व. शि. माळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.