कोल्हापूर दि. १३ : कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेकडे सर्व नोंदणीकृत मजूर सह. संस्था यांच्यासाठी काम वाटप समितीची बैठक दि. १६ डिसेंबर २०११ रोजी सकाळी ११ वाजता तर सुशिक्षित बेरोजगार (स्थापत्य) अभियंते यांची बैठक दुपारी १२ वाजता जिल्हा परिषदेच्या जुन्या सभागृहात (कागलकर हाऊस) येथे आयोजित करण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेकडील सर्व नोंदणीकृत सुशिक्षित बेरोजगार (स्थापत्य) अभियंते व मजूर सह. संस्था यांनी काम मागणीचे अर्ज दि. १५ डिसेंबर २०११ रोजी सायं. ५-४५ वाजेपर्यंत बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्या कार्यालयात द्यावेत. बैठकीला ज्यांच्या नावे सुशिक्षित बेरोजगार अभियंते व मजूर संस्थांचे जिल्हा परिषदेचे रजिस्ट्रेशन आहे त्यांनी स्वतः व मजूर संस्थांचे चेअरमन यांनी नोंदणी पत्राची मूळ प्रत घेऊन हजर रहावे, असे सदस्य सचिव तथा कार्यकारी अभियंता (बांधकाम), जिल्हा परिषद, कोल्हापूर यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.