सोमवार, ५ डिसेंबर, २०११

पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा कार्यक्रम

       कोल्हापूर दि. ५ : राज्याचे सहकार, संसदीय कार्य तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील दि. ६ डिसेंबर २०११ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
      दि. ६ डिसेंबर २०११ रोजी सायं. ५ वाजता इंदापूरहून वडगाव येथे आगमन व आयोजित सभेस उपस्थिती. ६-३० वा. वडगाव येथून मोटारीने इचलकरंजीकडे प्रयाण. ७ वाजता इचलकरंजी येथे आगमन व सभेस उपस्थिती. रात्रौ ९-३० वा. इचलकरंजीहून कोल्हापूरकडे प्रयाण. १० वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन, राखीव व मुक्काम.
      दि. ७ डिसेंबर २०११ रोजी सकाळी ७ वाजता कोल्हापूरहून मोटारीने बावडा, ता. इंदापूरकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.