कोल्हापूर दि. २२ : ज्येष्ठ अभिनेते रमेश देव, अभिनेत्री सीमा देव आणि सिनेपत्रकार इसाक मुजावर यांचा आज जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कोल्हापुरात तिसर्या थर्ड आय एशियन कोल्हापूर फिल्म फेस्टीव्हलचे उद्घाटन आज शाहू स्मारक भवनात ज्येष्ठ प्रसिध्द दिग्दर्शक श्रीमती सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले.
जिल्हा प्रशासन कोल्हापूर, कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी, कोल्हापूर महानगरपालिका, द एशियन फिल्म फाऊंडेशन मुंबई, राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट, कोल्हापूर व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांनी महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने फेस्टीव्हल आयोजित केला आहे.
यावेळी श्री. रमेश देव, सीमा देव आणि इसाक मुजावर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. त्यांनी आपल्या यशाचं सारं श्रेय कोल्हापूरला आणि आपल्या गुरुजनांना अर्पण केले.
दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांनी अशा प्रकारच्या चित्रपट महोत्सवातून सुजाण आणि जाणकार प्रेक्षक निर्माण होईल, अशी आशा व्यक्त केली. जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी अशा प्रकारचे चित्रपट महोत्सव चांगले आणि सुजाण पे्रक्षक घडवतात त्यामुळे असे महोत्सव व्हायला हवेत, असे सांगितले.
थर्ड आय एशियन फिल्म फेस्टीव्हलचे २२ ते २९ डिसेंबर २०११ या कालावधीत कोल्हापुरमध्ये आयोजन करण्यात आले आहे. थर्ड आय एशियन फिल्म फेस्टीव्हल आयोजनाचे हे तिसरे वर्ष असून विशेष म्हणजे यावर्षी या फेस्टीव्हलपैकी कांही चित्रपट इचलकरंजी या उपकेंद्गातही प्रदर्शित करण्यात येणार असल्याने इचलकरंजीकरांनाही यावेळी फेस्टीव्हलचा आस्वाद घेता येणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.