कोल्हापूर दि. २३ : जिल्हाधिकारी कार्यालय पुरवठा शाखा व अन्नधान्य वितरण अधिकारी, कोल्हापूर यांच्यातर्फे केशवराव भोसले नाट्यगृहातील बाबुराव पेंढारकर सभागृहात दि. २४ डिसेंबर २०११ रोजी सकाळी १० ते सायं. ६ वाजेपर्यंत राष्ट्रीय ग्राहक दिन आयोजित करण्यात आला आहे.
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त अन्न व औषध भेसळ, वजनमापे फसवणूक, एस. टी. / के. एम. टी. प्रवास सवलत योजना, दूरध्वनी योजना आदीबाबत संबंधित खात्यांमार्फत प्रदर्शन आयोजित करण्यात येणार असून ग्राहक प्रबोधनपर व्याख्यान होणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी, कोल्हापूर यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.