कोल्हापूर दि. १७ : राज्यस्तरीय उद्योग मित्र समितीची बैठक ७ जानेवारी २०१२ रोजी दुपारी २ वाजता बाबुभाई चिनाय कमिटी रुम, इंडियन मर्चंट चेंबर, आय. एम. सी. मार्ग, चर्चगेट, मुंबई येथे विकास आयुक्त (उद्योग) तथा अध्यक्ष उद्योग मित्र यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस राज्यस्तरीय महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
उद्योजकांना व संघटनांना बैठकीच्या कार्यसूचीवर घ्यावयाचे प्रश्न व त्यांची परिपूर्ण माहिती शेखर नाईक, निमंत्रक, उद्योग मित्र यांच्या नावे उद्योग संचालनालय, नवीन प्रशासन भवन, दुसरा मजला, मंत्रालयासमोर, मुंबई-४०० ०३२ (दूरध्वनी क्र. ०२२-२२०२६७५५ किंवा फॅक्स क्र. ०२२-२२०२६८२६ E-mail – divmitra@maharashtra.gov.in ) येथे २६ डिसेंबर २०११ पर्यंत कार्यालयास पोहचेल अशी पाठविण्यात यावी. या तारखेपर्यंत प्राप्त होणार्या प्रश्नांचा समावेश कार्यसुचीवर होईल याची उद्योजकांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी वा. दौ. देसले, उद्योग उपसंचालक (उमि) यांच्या दूरध्वनी क्र. ०२२-२२०४४१०७ वर संपर्क साधावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.