गुरुवार, ८ डिसेंबर, २०११

हातकणंगले तालुका हद्दीत प्रवेश करण्यास मनाई दुरुस्ती आदेश जारी

          कोल्हापूर दि. ८ : हातकणंगले तालुक्यात नगरपालिका निवडणूक चालू असल्याने या कालावधीत आपल्याकडून गंभीर स्वरुपाचा गुन्हा होऊन सार्वजनिक शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून फौजदारी संहिता कलम १४४ (२) नुसार हातकणंगले तालुक्याचे कार्यकारी दंडाधिकारी समीर शिंगटे यांनी ३४ जणांना हातकणंगले तालुक्याच्या हद्दीत दि. १२ डिसेंबर २०११ पर्यंत प्रवेश करण्यास मनाई केली आहे.तथापि ११ डिसेंबर २०११ रोजी इचलकरंजी नगरपालिकेचे मतदान असल्याने या दिवशी दुपारी १२ ते सायं.  ४ वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावण्याकरिता इचलकरंजी शहरामध्ये प्रवेश करण्यास परवानगी देण्यात येत आहे.
      हातकणंगले तालुका हद्दीत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आलेल्या दखलपात्र गुन्हे दाखल असलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. आरीफ शमशुद्दीन मोमीन, रवि संपत यादव, किरण रामचंद्ग तनपुरे, सुनिल गोविंद वडर, आसिफ नासिरखान पठाण, संदीप महादेव जरळी, राजेशिल सत्यवान गुरसाळे, चंद्गकांत गणपती लोहार, गणेश बाळासाो गेजगे, सलीम मसलुद्दीन खान, नासिद मसलुद्दीन खान, सिध्दार्थ शिवाजी कांबळे ऊर्फ नरंदेकर, जावेद सलीम खान, पिंटू ऊर्फ राजू सदाशिव डावरे, शिवाजी ऊर्फ शिवा सध्दाप्पा नाईक, बाळू काका देसाई, समीर ऊर्फ बशीर मेहबुब शेख, द्वारकाधिश ऊर्फ द्वारकाप्रसाद जयनारायण खंडेलाल, अविनाश अशोक शिंदे, अमर नानासो पार्डे, मनोज ऊर्फ बिट्या शिवाजी वेदांते, संतोष काशिनाथ जाधव, दिपीप बापू एकले, राजु तुकाराम पाटील, शाम रंगा लाखे, राजू निसार देसाई, सचिन शिवाजी पताडे, प्रविण दत्तात्रय रावळ, समरजीत शिवाजी पाटील, अनुप भाऊसाो सिदनाळे, राजू ऊर्फ बच्चू लक्ष्मण कांबळे, अजय भगवान हवालदार, अवधूत गजानन अब्दागिरे, अक्षय राजेंद्ग नेमिष्टे.
      तसेच भिमराव अभिमान थोरे यांना लागू केलेले फौजदारी व्यवहार संहिता १९७३ चे कलम १४४ (२) रद्द करण्यात आले असल्याचे तालुका कार्यकारी दंडाधिकारी समीर शिंगटे यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.