कोल्हापूर दि. २६ : देशाचं भवितव्य घडविण्याची ताकद केवळ युवाशक्तीमध्येच असते, या युवाशक्तीला विधायक दिशा देण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी आज येथे केले.
नेहरु युवा केंद्ग, कोल्हापूर यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या युवा संमेलनाचा कार्यक्रम आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाला. त्यावेळी ते बोलत होते. श्री. मंडलिक म्हणाले, कोणत्याही देशाची खरी शक्ती त्या देशातील युवकांच्यावरच अवलंबून असते. कोणतीही चळवळ, प्रगती किंवा मोठे यश हे युवकांच्या कष्टावर आणि मेहनतीवरच अवलंबून आहे. त्यामुळे युवाशक्ती आपल्या देशासाठी अतिशय महत्वाची आहे. आपल्या देशाने माहिती तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, सेवा क्षेत्र अशा विविध क्षेत्रात चांगली प्रगती साध्य केली आहे. पण या सार्याचा पाया शेती आणि ग्रामीण भागात आहे, याची जाणीव युवकांनी ठेवण्याची आवश्यकता आहे. शेती आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी युवकांनी आपलं योगदान देण्याची आवश्यकता आहे, असे आवाहनही खासदार मंडलिक यांनी यावेळी केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव म्हणाले, कोणताही चांगला बदल घडून येण्यासाठी युवकांचा पाठिंबा असण्याची फार आवश्यकता असते. युवाशक्तीच्या पाठबळाशिवाय परिवर्तन अशक्य आहे. भारतीय युवकांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप उमटवली आहे. युवकांनी अंधश्रध्दा, वाईट चालीरीती, परंपरा यांच्याविरुध्द काम करायला हवे.
यावेळी भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे चंद्गकांत चव्हाण, हस्तकला केंद्गाचे सहाय्यक संचालक राजेंद्ग सिंह, महिला आर्थिक विकास महामंडळाचे कुंदन शिनगारे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक नेहरु युवा केंद्गाचे जिल्हा समन्वयक भगवान गवई यांनी केले. यावेळी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या हस्ते तरुण मंडळांना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.