कोल्हापूर दि. ५ : हातकणंगले तालुक्यात नगरपालिका निवडणूक चालू असल्याने या कालावधीत आपल्याकडून गंभीर स्वरुपाचा गुन्हा होऊन सार्वजनिक शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून फौजदारी संहिता कलम १४४ (२) नुसार हातकणंगले तालुक्याचे कार्यकारी दंडाधिकारी समीर शिंगटे यांनी १२ जणांना हातकणंगले तालुक्याच्या हद्दीत दि. ९ डिसेंबर २०११ पर्यंत प्रवेश करण्यास मनाई केली आहे. तथापि ८ डिसेंबर २०११ रोजी इचलकरंजी नगरपालिकेचे मतदान असल्याने सदर दिवशी दुपारी दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावण्याकरिता इचलकरंजी शहरामध्ये प्रवेश करण्यास परवानगी देण्यात येत आहे.
हातकणंगले तालुका हद्दीत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आलेल्या दखलपात्र गुन्हे दाखल असलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. राजु तुकाराम पाटील, भिमराव अभिमान थोरे, शाम रंगा लाखे, राजू निसार देसाई, सचिन शिवाजी पताडे, प्रविण दत्तात्रय रावळ, समरजीत शिवाजी पाटील, अनुप भाऊसो सिदनाळे, राजू ऊर्फ बच्चू लक्ष्मण कांबळे, अजय भगवान हवालदार, अवधूत गजानन अब्दागिरे, अक्षय राजेंद्ग नेमिष्टे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.