मंगळवार, १३ डिसेंबर, २०११

बेकायदा गोवा बनावटीची रिअल सेव्हन व्हिस्कीची १८० पाकिटे जप्त

        कोल्हापूर दि. १३ : कोल्हापूरच्या राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या भरारी पथकाने १० डिसेंबर २०११ रोजी भुदरगड तालुक्यातील अरळगुंडी येथे राजाराम गुंडू पाटील राहणार बिलाकवाडी यांच्याकडून बेकायदा गोवा बनावटीचा ६ हजार ३५० रुपयांचा रिअल सेव्हन व्हिस्कीचे ९० मिलीची १८० पाकिटे (पाऊच) मुद्देमाल जप्त करुन आरोपीस अटक केली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक ए. बी. चासकर यांनी दिली.
      या कार्यवाहीत सर्वश्री निरीक्षक डी. जी. माने, दुय्यम निरीक्षक पी. ए. मुळे, एम. एस. पाटील तसेच कॉन्स्टेबल माधव चव्हाण, विक्रम मोरे, सुहास वरुटे सहभागी झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.