कोल्हापूर दि. १३ : शासनाने दि. २१ नोव्हेंबर २०११ च्या शासन निर्णयाद्वारे नवीन उच्च माध्यमिक शाळांना कायम विनाअनुदानित तत्वावर परवानगी देण्याकरिता बृहत आराखडा जाहीर केला आहे. या संदर्भात शासनाने त्यावर जनतेच्या हरकती, आक्षेप, सुचना मागविल्या आहेत.
उच्च माध्यमिक शाळा संदर्भातील बृहत आराखडा संदर्भात जनतेच्या हरकती, आक्षेप, सुचना असतील तर त्यांनी १९ डिसेंबर २०११ पूर्वी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करुन त्याची एक प्रत कोल्हापूर विभागाच्या शिक्षण उपसंचालकांकडे द्यावी. या संदर्भातील शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०११११२१०५२६००००१ असा आहे, असे माध्यमिक शिक्षणाधिकार्यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.