कोल्हापूर दि. १२ : कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या घाऊक, किरकोळ, हॉकर्स, फ्रिसेल केरोसिन परवानाधारक, रास्तभाव धान्य दुकानदार परवानाधारकांच्या परवाना नुतनीकरणाची मुदत ३१ डिसेंबर २०११ अखेर असलेल्यांनी पुढील कालावधीसाठी परवाना नुतनीकरण करुन घेण्यासाठी तात्काळ आपल्या संबंधित तहसिलदार अथवा जिल्हा पुरवठा अधिकार्यांशी संपर्क साधावा. नुतनीकरणासाठी आवश्यक असणारी रक्कम चलनाद्वारे सरकारी खजिन्यात जमा करुन मूळ परवाना व चलन जिल्हा पुरवठा कार्यालय, कोल्हापूर यांच्याकडे सादर करुन आपला परवाना नुतनीकरण करुन घ्यावा. तसेच दिलेल्या मुदतीत परवाना नुतनीकरण करुन न घेतल्यास अथवा नुतनीकरण करण्यास विलंब झाल्यास शासन सुचनेप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे जिल्हा पुरवठा अधिकारी, कोल्हापूर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.