इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, २९ डिसेंबर, २०११

तिसर्याा एशियन फिल्म फेस्टीव्हलची सांगता बाबू बँड बाजा सर्वोत्कृष्ठ चित्रपटाचा मानकरी

         कोल्हापूर दि. २९ : तिसर्‍या एशियन फिल्म फेस्टीव्हलमध्ये बाबू बँड बाजा हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला. बी. नांद्गेकर यांच्या स्मृतीनिमित्त दिला जाणारा उत्कृष्ट अभिनेत्यासाठीचा पुरस्कार मंगेश देसाई तर अरुण सरनाईक यांच्या स्मृतीनिमित्त दिला जाणारा उत्कृष्ट अभिनेत्यासाठीचा पुरस्कार मिलींद शिंदे यांना मिळाला. स्मिता पाटील यांच्या स्मृतीनिमित्त उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिताली जगताप हिने पटकाविला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार बाबू बँड बाजा या चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश पिंजाणी यांना मिळाला.
      तिसर्‍या एशियन फिल्म फेस्टीव्हलची आज सांगता झाली. शाहू स्मारक भवनात आजचा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम झाला. जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, रशियन विदुषी डॉ. इरिना ग्लुश्कोव्हा यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले.
      डॉ. मोहन आगाशे म्हणाले, चित्रपट आणि साहित्याने कुतुहल निर्माण करण्याची आवश्यकता आहे. चित्रपटांनी एखाद्या विषयावर कुतुहल निर्माण केल्यास त्याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याची इच्छा दर्शकाला होते, हेच खरे त्या चित्रपटाचे यश आहे. चित्रपटांची भाषा ही दृकश्राव्य असते. ही भाषा आपल्याला उपजतच असते. पण या भाषेचेही शिक्षण मिळणे आवश्यक आहे.
      जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी एशियन फिल्म फेस्टीव्हलला चांगला प्रतिसाद मिळत आहे याबद्दल समाधान व्यक्त केले. या फेस्टीव्हलने कोल्हापुरातील तरुणांना व्यासपीठ करुन दिले आहे असे सांगितले. यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष मिलींद अष्टेकर, महाराष्ट्र संस्कृतीच्या अभ्यासिका डॉ. इरिना ग्लुश्लोव्हा, उपजिल्हाधिकारी सुभाष बोरकर, चंद्गकांत जोशी, दिलीप बापट आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
      दिग्दर्शक चंद्गकांत जोशी यांनी प्रास्ताविक तर सोनाली नवांगुळ यांनी सूत्रसंचलन केले.   पर्यटन या विषयावर आधारित लघु चित्रपटाच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यातील विजेते पुढीलप्रमाणे - चित्रपटाचे नांव, कंसात दिग्दर्शक १) करवीर काशी (शिरीष हुपरीकर), २) इन्स्पिरेशन ऑफ कोल्हापूर (प्रसाद मयेकर), ३) चवदार कोल्हापूर (सौरभ प्रभूदेसाई), उत्तेजनार्थ - १) कोल्हापूरची एकपाषाणी मंदिरे (अमित गद्गे), २) जुना राजवाडा इतिहासाचा साक्षीदार (मास कम्युनिकेशन विभाग, शिवाजी विद्यापीठ), विशेष उल्लेखनीय - १) पाणी, किंमत (यशोधन गडकरी), २) दगड फूल (सुभाष पाटील).

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.