सोमवार, २६ डिसेंबर, २०११

हवामान व पीक परिस्थिती अहवाल

           कोल्हापूर दि. २६ : कोल्हापूर जिल्ह्याचा १६ डिसेंबर ते २३ डिसेंबर २०११ अखेरचा हवामान व पीक परिस्थितीचा साप्ताहिक अहवाल जिल्हा परिषदेच्या कृषि विकास अधिकार्‍यांकडून प्राप्त झाला असून तो पुढीलप्रमाणे आहे. अहवाल कालावधीत जिल्ह्यात आकाश निरभ्र होते व थंडीचे प्रमाण वाढत होते. सुरु ऊसाची लागण सुरु होती. आडसाली व पूर्वहंगामी ऊसामध्ये आंतर मशागतीची कामे चालू असून ऊस तोडणी सुरु आहे. लवकर पेर झालेली तूर पक्वतेच्या अवस्थेत तर उशीरा पेर शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. लवकर पेर झालेली ज्वारी पोटरीच्या अवस्थेत तर उशीर पेर वाढीच्या अवस्थेत आहे. हरभरा पेरणी सुरु होती व उगवण समाधानकारक आहे तसेच लवकर पेर वाढीच्या अवस्थेत आहे. गव्हाची पेरणी सुरु असून उगवण समाधानकारक आहे. लवकर पेर वाढीच्या अवस्थेत असल्याची माहिती कृषि विकास अधिकार्‍यांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.