गुरुवार, ८ डिसेंबर, २०११

सामान्य प्रशासन राज्यमंत्री फौजिया खान यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा कार्यक्रम

        कोल्हापूर दि. ८ : राज्याच्या सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क, सांस्कृतिक कार्य, राजशिष्टाचार, शालेय शिक्षण, महिला व बाल विकास, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण आणि अल्पसंख्यांक विकास (औफाकसह) खात्याच्या राज्यमंत्री फौजिया खान दि. ९ डिसेंबर २०११ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
         शुक्रवार दि. ९ डिसेंबर २०११ रोजी सायं. ५-३० वाजता पिंपरी चिंचवड येथून मोटारीने इचलकरंजी येथे आगमन. सायं. ६ वाजता इचलकरंजीतील मौलाना आझाद इंग्लिश स्कूल समोर कृष्णानगर येथे इचलकरंजी रा. कॉ. पक्ष आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. रात्रौ ८-३० वाजता मधुकर मुसळे बापू यांच्या निवासस्थानी राखीव. ९ वाजता इचलकरंजीहून मोटारीने सांगलीकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.