मंगळवार, १३ डिसेंबर, २०११

राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष के. आर. व्यास यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा कार्यक्रम

       कोल्हापूर दि. १३ : राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष के. आर. व्यास दि. १५ डिसेंबर २०११ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
      दि. १५ डिसेंबर २०११ रोजी सकाळी ७-२० वाजता मुंबईहून कोल्हापूर रेल्वे स्टेशन येथे आगमन व सर्किट हाऊस कोल्हापूर येथे राखीव. दुपारी १ वाजता शिरोळ पोलीस लॉकअपला भेट. ३ वाजता सर्किट हाऊस, इचलकरंजी येथे आगमन व त्यानंतर सर्किट हाऊस, कोल्हापूर येथे आगमन व मुक्काम.
      दि. १६ डिसेंबर २०११ रोजी सकाळी ११ वाजता कारागृहास भेट व सर्किट हाऊस, कोल्हापूर येथे गार्‍हाणी ऐकणार. रात्रौ ८-२५ वाजता कोल्हापूरहून महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.