मंगळवार, १३ डिसेंबर, २०११

पन्हाळा वगळता आठ नगरपरिषदांची विशेष सभा शनिवारी अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची निवड होणार

कोल्हापूर दि. १२ : कोल्हापूर जिल्ह्यातील ९ नगरपरिषदांच्या निवडणुकांचे निकाल आज घोषित करण्यात आले. नऊ नगरपरिषदांपैकी पन्हाळा वगळता सर्व आठ नगरपरिषदांची मुदत १६/१२/२०११ रोजी संपत असून नविन सभागृहाची पहिली बैठक (विशेष सभा) शनिवार दि. १७/१२/२०११ रोजी आयोजीत केली असून सदर सभेमध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी  लक्ष्मीकांत देशमुख यांनी कळविले आहे.
विशेष सभेची आज नोटीस काढण्यात आली असून अध्यक्ष पदासाठी (गडहिंग्लज-खुला  (म), इचलकरंजी-नामाप्र (म) जयसिंगपूर- खुला (म),कागल- नामाप्र (म),कुरुंदवाड-खुला (म),मलकापूर-खुला(म) मुरगूड-अजा (म), वडगाव-अजा) अशा शासनाने जाहिर केलेल्या आरक्षणानुसार मंगळवार  दि.१३/१२/२०११  रोजी  दुपारी २.०० पर्यंत नगरपरिषदेच्या मुख्य अधिकार्‍यांकडे नामनिर्देशन पत्र दाखल करावयाचे असून संबंधीत पिठासन अधिकारी यांनी त्याच दिवशी दु. २.०० वाजता छाननी प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे.उपाध्यक्ष पदासाठी शनिवार दि. १७/१२/२०११ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० पर्यंत संबंधीत नगरपरिषदेच्या मुख्य अधिकार्‍यांकडे नामनिर्देशन पत्र दाखल करावयाचे असून  त्याच दिवशी दुपारी १२.०० ते १२.३० वाजता छाननी करण्यात येऊन दुपारी १२.३० वाजता अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया विशेष सभेमध्ये पूर्ण करण्यात येईल असे जिल्हाधिकारी श्री. देशमुख यांनी कळविले आहे.
 कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड, मलकापूर, कागल, मुरगूड, पन्हाळा, जयसिंगपूर, गडहिंग्लज, वडगाव आणि इचलकरंजी या नगरपरिषदांसाठी रविवार दिनांक ११ डिसेंबर २०११ रोजी मतदान झाले होते. सार्वत्रिक निवडणूक शांततेत पार पाडल्या बद्दल सर्व राजकीय पक्ष, संघटना, अपक्ष उमेदवार तसेच सर्व नागरीक, सर्व निवडणूक कामकाजाशी संबंधीत सर्व विभागाचे अधिकारी,कर्मचारी,पोलिस विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शिपाई,सर्व पत्रकार,इलेक्ट्रॉनिक मिडीया यांचे जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी आभार मानले आहेत.
      नगरपरिषद निहाय निकालाचा गोषवारा पुढील प्रमाणे -
१) कुरुंदवाड न. प.- शहर सुधारणा आघाडी- ९, राष्ट्रवादी काँग्रेस- ८,
२) मलकापूर न.प.- राष्ट्रवादी काँग्रेस- ७, जनसुराज्य -५, शहर विकास आघाडी- ५.
३) कागल न. प.- राष्ट्रवादी काँग्रेस व श्री. छ. शाहू आघाडी- १५, भारतीय राष्ट्रीय
   काँग्रेस- २.
४) मुरगूड न.प.-  छ.शिवाजी महाराज विकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस- १३,
   भारतीय राष्ट्रीय काँग्रेस- ४.
५) पन्हाळा न. प.- जनसुराज्य- १७.
६) गडहिंग्लज न.प- राष्ट्रवादी काँग्रेस- ९, जनता दल - ६, अपक्ष- १, जनसुराज्य- १.
७) वडगाव न. प.- यादव पॅनल आघाडी- १३, राष्ट्रवादी काँग्रेस- ४.
८) इचलकरंजी न. प- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस-३०, शहर सुधारणा आघाडी -१७,
   राष्ट्रवादी काँग्रेस- १०.
९) जयसिंगपूर न. प.- राजर्षी शाहू विकास आघाडी- १८, अपक्ष- १, (प्रभाग क्र.५ मधील चार जागा वगळून - सदर जागांसाठी मतदान व मतमोजणी दि. १६/१२/२०११ रोजी आहे.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.