कोल्हापूर दि. २ : शिक्षण उपसंचालक कार्यालय, कोल्हापूर यांच्यामार्फत अनुदानित उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयात नियुक्त केलेल्या शिक्षकांची / शिक्षण सेवकांची वैयक्तिक शिक्षक मान्यता शिबीर ७ व ८ डिसेंबर २०११ या कालावधीत आयोजित केले आहे. हे शिबीर शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर येथे होणार असून ७ डिसेंबर २०११ रोजी कोल्हापूर (शहर), करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, कागल, राधानगरी, गगनबावडा तर ८ डिसेंबर २०११ रोजी गडहिंग्लज, चंदगड, हातकणंगले, शिरोळ, आजरा, भुदरगड या तालुक्यातील उच्च माध्यमिक शाळांनी वैयक्तिक शिक्षक मान्यता करुन घेण्याची आहे.
तसेच दि. १२ डिसेंबर २०११ पर्यंत कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा व अनुदानित उच्च माध्यमिक शाळेतील कायम विनाअनुदानित वर्ग यांनी ऑनलाईन शिक्षक मान्यता माहिती भरावी असे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकार्यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.