कोल्हापूर दि. २ : जलविज्ञान प्रकल्पांतर्गत वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कोल्हापूर यांच्यावतीने ७ डिसेंबर २०११ रोजी इंजुबाईदेवी सांस्कृतिक भवन, गारगोटी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर येथे तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य तसेच सेवाभावी संस्थांचे सदस्य/प्रतिनिधी यांच्यासाठी पाणी व पाण्याचे महत्व, भूजल अधिनियम, शिवकालीन पाणी साठपण योजना, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल स्त्रोत बळकटीकरण कार्यक्रम, पाण्याची गुणवत्ता व समस्या, कृत्रिम पुनर्भरण, हातपंप देखभाल दुरुस्ती व पाण्याचा संयुक्त वापर या विषयाबाबत एक दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यशाळा सकाळी ९-३० ते सायं. ५-३० या वेळेत आयोजित केली असून आमदार के. पी. पाटील यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे. भुदरगड पंचायत समितीचे सभापती बापूसाहेब आरडे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. भुदरगड पंचायत समितीचे उपसभापती राहूल देसाई आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेचे समाजकल्याण समिती सभापती गोपाळ कांबळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तरी सर्वांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन वरिष्ठ भूवैज्ञानिक पी. आर. मोरे व भुदरगड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी एच. डी. नाईक यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.