कोल्हापूर दि. २७ : सरत्या सालाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटक अभयारण्ये तसेच संरक्षित क्षेत्रांना भेटी देतात. यावेळी काही पर्यटकांकडून अभयारण्य आणि आजुबाजूच्या परिसरामध्ये व्यत्यय केला गेल्याने वन्यजीव विचलीत होत असल्याने दि. ३१ डिसेंबर २०११ व १ जानेवारी २०१२ या कालावधीमध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यान, राधानगरी, दाजीपूर, कोयना, बामणोली, सागरेश्वर अभयारण्ये बंद राहतील असे मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) कोल्हापूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.