कोल्हापूर दि. २६ : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, कोल्हापूर व विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. २७ डिसेंबर २०११ रोजी सकाळी ९-३० वाजता विवेकानंद कॉलेजच्या ग्रंथालय हॉलमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थींनीकरिता प्रबोधन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन होणार असून प्राचार्य डॉ. हिंदुराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबीर संपन्न होणार आहे. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्या शुभांगी गावडे व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय माने यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
महाराष्ट्र राज्य, महिला आयोग, मुंबई यांच्यामार्फत महिलांची सुरक्षिता व संरक्षण याबाबत असलेल्या तरतुदींची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी लिंगपद समभाव, कौटुंबिक हिंसाचार, हुंडा प्रतिबंध अधिनियम, बालविवाह, मुलींची छेडछाड, मुलींच्या जन्माचे घटते प्रमाण याबाबत जनजागृती करण्यासाठी महाविद्यालयीन शिबीरांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
लेक लाडकी अभियानची प्रवर्तक अॅड. वर्षा देशपांडे व डी. के. शिंदे स्कूल ऑफ सोशल वर्क, सायबर कोल्हापूरचे प्रा. डॉ. सौ. कालिंदी रानभरे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. या प्रबोधनपर शिबीरास जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे असे संयोजकांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.