शनिवार, १७ डिसेंबर, २०११

राज्य मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षांकडून शिरोळ दुय्यम कारागृहाची पाहणी

कोल्हापूर दि. १५ : राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष के.आर. व्यास यांनी आज शिरोळ येथील दुय्यम कारागृहाची पाहणी केली. यावेळी त्यांनी बंद्यांची विचारपूस केली. तसेच कामकाजाची आणि कारागृहाच्या व्यवस्थेची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले.
शिरोळ तालुक्याचे तहसिलदार डॉ. संपत खिलारी आणि पोलिस निरीक्षक रवींद्ग पवार यांनी राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष के.आर. व्यास यांना येथील कामकाजाची आणि कारागृहाच्या व्यवस्थेची माहिती दिली. यावेळी नायब तहसिलदार संभाजी हेरवाडे उपस्थित होते.        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.