कोल्हापूर दि. २३ : राज्याचे कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ आज रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्यावर आले असून त्यांचा दि. २४ ते २६ डिसेंबर २०११ या कालावधीतील कोल्हापूर जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
दि. २४ डिसेंबर २०११ रोजी सकाळी ७-३० ते ११-३० वाजेपर्यंत कागल निवासस्थानी गाठीभेटी. ११-३० वा. कोल्हापूरकडे प्रयाण. दुपारी १२ वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन व राखीव. सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण व मुक्काम.
दि. २५ डिसेंबर रोजी सकाळी ७-३० ते १० वाजेपर्यंत कागल निवासस्थानी गाठीभेटी. १० वाजता कागल येथील शाहू हॉलमध्ये हसन मुश्रीफ फौंडेशनच्यावतीने पोलीस भरतीमधील यशस्वी उमेदवारांच्या सत्कार समारंभास उपस्थिती. ११ वाजता कागल आगार येथे राष्ट्रवादी कॉग्रेस एस. टी. कामगार संघटना नामफलकाचे उद्घाटन. दुपारी २ वाजता कागल येथील शाहू हॉलमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मेळावा. ३-३० वाजता कोल्हापूरकडे प्रयाण. ४ वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन व राखीव. सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण व मुक्काम.
दि. २६ डिसेंबर २०११ रोजी सकाळी ७-३० ते ११-३० वाजेपर्यंत कागल निवासस्थानी गाठीभेटी. ११-३० वा. कोल्हापूरकडे प्रयाण. दुपारी १२ वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन व राखीव. रात्रौ ८-३० वाजता कोल्हापूरहून महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.