इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शनिवार, ३१ डिसेंबर, २०११

राष्ट्रीय मतदार दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करणारराष्ट्रीय मतदार दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करणार

       कोल्हापूर दि. ३१ : राष्ट्रीय मतदार दिन २५ जानेवारी २०१२ रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख होते.
      दरवर्षी २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. त्यानुसार राष्ट्रीय मतदार दिनी काय कार्यक्रम आखता येतील याचे नियोजन करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
      राष्ट्रीय मतदार दिनी म्हणजेच २५ जानेवारी २०१२ रोजी महाविद्यालयात निबंध स्पर्धा घ्याव्यात, सायकल रॅली काढणे, पथनाट्य, लोककला, लोकनृत्य आदी कार्यक्रमातून मतदानाबाबत जागृती करावी, असे ठरले.
      बैठकीस उपजिल्हाधिकारी सुभाष बोरकर, शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव सी. जी. शिंदे, कलाशिक्षक आझाद नायकवडी, अनंत यादव, भारती वैशंपायन आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.