शुक्रवार, २ डिसेंबर, २०११

जिल्हा साहित्य संमेलन, ग्रंथोत्सवास कोल्हापूरमध्ये आजपासून प्रारंभ

     कोल्हापूर दि. २ : कोल्हापूर जिल्हा साहित्य संमेलन आणि ग्रंथोत्सवास उद्या, शनिवार दि. ३ डिसेंबर २०११ पासून येथील राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवन येथे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, मराठी भाषा विभाग, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन आणि राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
      संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक सखा कलाल असणार आहेत. त्यांच्याच हस्ते केशवराव कोठावळे ग्रंथनगरीचे उद्‌घाटन सकाळी दहा वाजता होईल. यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके, ज्येष्ठ साहित्यिक चंद्गकुमार नलगे, इतिहासतज्ञ जयसिंगराव पवार, प्रा. अशोक चौसाळकर, प्रा. मा. गो. माळी, उपसंचालक (माहिती) वसंत शिर्के आणि प्रा. विश्वनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.
      साहित्य संमेलनास साहित्य रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख व राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे सचिव प्रा. सुनीलकुमार लवटे यांनी केले आहे.
          उद्या संमेलनाच्या पहिल्या दिवशी उद्‌घाटन सत्र सकाळी १० ते ११-३० या कालावधीत असेल. त्यानंतरचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे असतील. सत्र दुसरे - सकाळी ११-३० ते दुपारी १-३० - सखा कलाल : व्यक्ती व वाड.मय, वक्ते- प्रा. भैरव कुंभार, रणधीर शिंदे. दुपारी १-३० ते २-३० विश्रांती.  सत्र तिसरे - दुपारी २-३० ते ४-३० प्रकट मुलाखत. दुपारी २-३० ते ३-३० गोविंद पानसरे. मुलाखतकार रणधीर शिंदे व मिलींद कदम, दुपारी ३-३० ते ४-३० अभिराम भडकमकर मुलाखतकार अरुण नाईक व सुरेश गुदले. सत्र चौथे - दुपारी ४-३० ते ६ माझे लेखन, माझे चिंतन, सत्राध्यक्ष- जालंधर पाटील, सहभाग - मोहन पाटील, म्ंदा कदम, मंजुश्री गोखले, किरण गुरव. सत्र पाचवे - रात्रौ ८ वाजता कलारजनी सादरकर्ते - सागर अध्यापक, सागर बगाडे. ग्रंथ प्रदर्शन सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत सुरु राहील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.