गुरुवार, १५ डिसेंबर, २०११

कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा कार्यक्रम

          कोल्हापूर दि. १५ : कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ दि. १६ डिसेंबर २०११ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
          दि. १६ डिसेंबर २०११ रोजी दुपारी ३ वाजता पुण्याहून शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन व राखीव. सोयीनुसार कागलकडे प्रयाण व मुक्काम.
          दि. १७ डिसेंबर रोजी सकाळी ७-३० ते ११ वाजेपर्यंत कागल निवासस्थानी गाठीभेटी. ११-३० वाजता कागल येथील शासकीय विश्रामगृहात नविद मुश्रीफ यांच्या समवेत चर्चा, त्यानंतर दुपारी १२ वाजता कागल तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालकांसमवेत बैठक. गडहिंग्लज येथे २ वाजता गडहिंग्लज येथील नूतन नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या सत्कार समारंभास उपस्थिती. सायं. ५ वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे अ‍ॅड. पी. डी. पवार यांच्या समवेत चर्चा. सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण व मुक्काम.
      दि. १८ डिसेंबर २०११ रोजी सकाळी ७-३० ते ९ वाजेपर्यंत कागल निवासस्थानी गाठीभेटी. ९ ते १२ वाजेपर्यंत कागल निवासस्थानी राखीव. दुपारी १२-१५ वाजता मोटारीने पुणे विमानतळाकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.