कोल्हापूर दि. २१ : जिल्हाधिकारी कार्यालय पुरवठा शाखा, कोल्हापूर यांच्यातर्फे केशवराव भोसले नाट्यगृहातील बाबुराव पेंढारकर सभागृहात दि. २४ डिसेंबर २०१० रोजी सकाळी ९-३० पासून राष्ट्रीय ग्राहक दिन आयोजित करण्यात आला आहे.
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त विविध खात्यांमार्फत प्रदर्शन आयोजित करण्यात येणार असून ग्राहक प्रबोधनपर व्याख्यान होणार आहे. तसेच राष्ट्रीय ग्राहक दिनी ग्राहकांच्या तक्रारीचे लेखी अथवा तोंडी निराकरण करण्यासाठी या विषयातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी, कोल्हापूर यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.