कोल्हापूर दि. १ : सैनिक शाळा, सातारा येथे प्रवेश परिक्षेद्वारा इ. सहावी व नववीच्या मुलांना २०१२-१३ सत्राच्या प्रवेशासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. इयत्ता सहावीसाठी उमेदवार २ जुलै २००१ ते १ जुलै २००२ (दोन्ही दिवस धरुन) या दरम्यान जन्मलेला असावा. इयत्ता नववीसाठी उमेदवार २ जुलै १९९८ ते १ जुलै १९९९ (दोन्ही दिवस धरुन) या दरम्यान जन्मलेला असावा.
विहित नमुन्यातील अर्जासह शाळेचे माहितीपत्रक व नमुना प्रश्नपत्रिका प्राचार्य, सैनिक शाळा, सातारा यांच्या नावे फक्त राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट पाठवून पुढील दराप्रमाणे मिळतील. सामान्य वर्ग, संरक्षण दल, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्गातील उमेदवारांसाठी रु. ४२५/- तसेच फक्त अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमधील उमेदवारांसाठी रु. २७५/-. पूर्णपणे भरलेले अर्ज सैनिक शाळा, सातारा येथे दि. १० डिसेंबर २०११ रोजी दुपारी १-३० वाजेपर्यंत स्वीकारले जातील. इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल सुहास नाईक यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.