कोल्हापूर दि. २३ : केंद्ग शासन पुरस्कृत दारिद्गय रेषेखालील राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना राज्य मंत्रीमंडळाच्या निर्णयानुसार २८ मार्च २००८ च्या शासन निर्णयान्वये राज्यात लागू करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हास्तरीय अंमलबजावणी व आढावा समितीची स्थापना करण्यात आली आहे. दारिद्गय रेषेखालील कुटुंब (एकूण ५ जण - पती, पत्नी व ३ मुले) लाभार्थी म्हणून पात्र राहतील. वर्षभरासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी मिळून एकूण तीस हजार रुपये इतकी आश्वासित रक्कम राहणार आहे.
ही योजना रोख रक्कम रहित असल्यामुळे लाभार्थ्याला कोणत्याही प्रकारची स्वतःची रक्कम दवाखान्यात द्यावी लागणार नाही. दवाखान्यात भरती होण्यापूर्वी एक दिवस व दवाखान्यातून सोडल्यानंतर पाच दिवसासाठीचा खर्च लाभार्थ्यास देय राहील.रुग्णास दवाखान्यात नेण्या-आणण्यासाठीचा खर्च (प्रत्येकवेळी जास्तीत जास्त शंभर रुपये अथवा प्रत्यक्ष झालेला खर्च) हा खर्च वार्षिक जास्तीत जास्त एक हजार रुपये देय राहणार आहे. शासकीय आणि खाजगी पात्र दवाखाना या योजनेंतर्गत आरोग्य सेवा पुरविणार आहेत. दवाखान्यांची निवड विमा कंपनी करणार असून योजनेच्या अंमलबजावणीसाठी विकास आयुक्त (असंघटित कामगार) मुंबई यांच्या कार्यालयाची नोडल एजन्सी म्हणून निवड करण्यात आली आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विमा सहाय्यक कक्ष, आढावा समिती, तांत्रिक समितीची स्थापना करण्यात आली आहे.
प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला एक स्मार्ट कार्ड पुरविण्यात येणार असून योजनेंतर्गत केंद्ग, राज्य व लाभार्थी यांचा वाटा पुढीलप्रमाणे राहणार आहे. केंद्ग शासन - विम्याच्या वार्षिक हप्त्याच्या ७५ टक्के अधिक स्मार्ट कार्डची किंमत साठ रुपये, राज्य शासन - विम्याच्या वार्षिक हप्त्याच्या २५ टक्के अधिक योजनेच्या कार्यान्वयनासाठी येणारा प्रशासकीय खर्च, लाभार्थी - तीस रुपये वर्ष नोंदणी/नुतनीकरण फी. केंद्ग शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सुचना व प्रारुप निविदेच्या आधारे कोल्हापूर जिल्ह्यासाठी अपोलो म्युनिच हेल्थ इंश्युरन्स कंपनी लि. ही कंपनी निश्चित करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी व अध्यक्ष, राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना, कोल्हापूर व सहाय्यक कामगार आयुक्त व सदस्य सचिव, राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना, कोल्हापूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.