कोल्हापूर दि. २ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या ३ जून २०११, २० जुलै २०११ व २० ऑगस्ट २०११ च्या शासन निर्णयानुसार शासकीय/निमशासकीय तसेच राज्य शासन अनुदान प्राप्त संस्थातील सेवेत नियुक्त झालेल्या तसेच होणार्या अंध, क्षीणदृष्टी, मूकबधिर, अस्थिव्यंग कर्मचार्यांना आवश्यक सहाय्यक साधने उपलब्ध करुन देण्याची तरतूद आहे.
शासकीय/निमशासकीय तसेच राज्य शासन अनुदान प्राप्त संस्था, अंगीकृत उपक्रम, महामंडळे येथे कार्यरत असलेल्या व होणार्या अंध, क्षीणदृष्टी, मूकबधिर, अस्थिव्यंग कर्मचार्यांना आवश्यक असणारी साधने व उपकरणांच्या वापराविषयी माहिती शिबीराचे आयोजन ७ डिसेंबर २०११ रोजी अल्पबचत भवन, पुणे स्टेशन जवळ, पुणे येथे सकाळी ११ वाजता आयोजित केले आहे.
तरी सर्व कार्यालयातील कार्यरत असणार्या अंध, क्षीणदृष्टी, मूकबधिर, अस्थिव्यंग कर्मचार्यांनी या शिबीरास उपस्थित रहावे, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी वृषाली शिंदे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.