इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, ३० डिसेंबर, २०११

क्रीडा मार्गदर्शक पदासाठी व्यावसायिक चाचणी कार्यक्रम जाहीर

कोल्हापूर दि. ३० : क्रीडा मार्गदर्शक पदासाठी गुणवत्तानिहाय पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या व्यावसायिक चाचणीचा कार्यक्रम १६ ते २४ जानेवारी २०१२ या कालावधीत शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे, बालेवाडी पुणे येथे आयोजित करण्यात आल्याचे उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, कोल्हापूर यांनी कळविले आहे.
क्रीडा मार्गदर्शक पदासाठी दिनांक २३ मे २०१० रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या लेखी परीक्षेतील गुणवत्तानिहाय पात्र उमेदवारांची यादी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या http://www.mahasportal.gov.in/ या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
गुणवत्तानिहाय पात्र उमेदवारांच्या ८० गुणांच्या व्यावसायिक चाचणीचा कार्यक्रम शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे, बालेवाडी पुणे येथे होणार असून पात्र उमेदवारांना आवेदनपत्रे पाठविण्यात आली आहेत. वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या पात्र यादीतील ४५ गुण प्राप्त उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना व्यावसायिक चाचणीसाठी आवेदनपत्र प्राप्त झाले नसल्यास अशा उमेदवारांनी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे येथील दूरध्वनी क्र. २६१४००७१ अथवा भ्रमणध्वनी   क्र. ८९७५०६२६३६ व ८४४६२५३१०६ वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.