शुक्रवार, २ डिसेंबर, २०११

राष्ट्रीय कृषि विमा योजनेंतर्गत विविध पिकांना विमा संरक्षण

         कोल्हापूर दि. २ : राष्ट्रीय कृषि विमा योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील पिकांना सन २०११-१२ रब्बी हंगामामध्ये विमा संरक्षण लागू करण्यात आले आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड, पूर, अतिवृष्टी आणि दुष्काळामुळे शेतीचे नुकसान होते. अशावेळी शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावे लागते. शेतकर्‍यांना होणार्‍या नुकसानीतून वाचविण्यासाठी व खर्चाची भरपाई होण्यासाठी शासनाने राष्ट्रीय कृषि विमा योजना सुरु केली आहे.
      सन २०११-१२ या रब्बी हंगामात कोल्हापूर जिल्हातील गहू (बा.), सूर्यफूल, उन्हाळी भुईमूग, उन्हाळी भात, कांदा, गहू (जि.), ज्वारी (बा.), ज्वारी (जि.), हरभरा, करडई या पिकांना संरक्षणाखाली आणले आहे.                                                  
अ.क्र.
पीक
सर्व साधारण जोखीम स्तर (टक्के)
सर्वसाधारण विमा संरक्षण
(प्रति हेक्टर)
(उंबरठा उत्पन्न पातळीपर्यंत)
अतिरिक्त विमा संरक्षण प्रति हेक्टर (उंबरठा उत्पन्न पातळीच्या पुढे आणि सरासरी उत्पन्नाच्या १५० टक्केपर्यंत)
एकूण विमा संरक्षित रक्कम
(रु.)
एकूण विमा हप्ता (रु.)
विमा संरक्षित रक्कम
(रु.)
सर्वसाधा-रण विमा हप्ता दर
(टक्के)
विमा हप्ता
(रु.)
विमा संरक्षित रक्कम
(रु.)
सर्वसाधारण विमा हप्ता दर
(टक्के)
विमा हप्ता
(रु.)
१०
११
गहू (बा.)
८०
१५८००
१.५०
२३७
१३८००
९.८५
१३५९
२९६००
१५९६
सूर्यफूल
८०
१३७००
२.००
२७४
१२०००
११.६०
१३९२
२५७००
१६६६
उ. भुईमूग
८०
३३३००
२.००
६६६
२९१००
५.३०
१५४२
६२४००
२२०८
उ. भात
८०
२००००
२.००
४००
१७५००
४.१५
७२६
३७५००
११२६
कांदा
८०
१२१५००
१०.८५
१३१८३
१०६३००
१०.८५
११५३४
२२७८००
२४७१७
गहू (जि.)
८०
५७००
११.४०
८६
५०००
११.४०
६५६
१०७००
७४२
ज्वारी (बा)
८०
८९००
१०.३५
१७८
७८००
१०.३५
८०७
१६७००
९८५
ज्वारी (जि)
८०
५४००
१२.६५
१०८
४७००
१२.६५
५९५
१०१००
७०३
हरभरा
८०
१२८००
१०.८०
२५६
११२००
१०.८०
१२१०
२४०००
१४६६
१०
करडई
८०
८५००
१३.१५
१७०
७५००
१३.१५
९८६
१६०००
११५६

      राष्ट्रीय कृषि विमा योजनेत बिगर कर्जदार शेतकरी सहभागी होऊ शकतात. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकर्‍यांनी त्यांचे विमा प्रस्ताव व विमा रक्कम पीक पेरणीनंतर एक     महिन्याच्या आत किंवा जास्तीत जास्त ३१ डिसेंबर २०११ यापैकी जे आधिचे आहे त्या तारखेपूर्वी बँकेत जमा करणे आवश्यक आहे. तसेच उन्हाळी भात व उन्हाळी भुईमूग या पिकाकरिता विमा प्रस्ताव व विमा रक्कम पीक पेरणीनंतर एक महिन्याचे आत किंवा जास्तीत जास्त ३१ मार्च २०१२ यापैकी जे आधिचे त्या तारखेपूर्वी बँकेत जमा करणे आवश्यक आहे. प्रस्तावासोबत पीक नोंदीचा गाव कामगार तलाठी यांच्याकडील ७/१२ चा उतारा जोडणे आवश्यक आहे.
      या योजनेतील गहू (बा.), सूर्यफूल, उन्हाळी भुईमूग, उन्हाळी भात व कांदा या पिकासाठी सहभागी होणार्‍या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांना विमा हप्त्यामध्ये १० टक्के अनुदान देय आहे व गहू (जि.), ज्वारी (बा.), ज्वारी (जि.), हरभरा व करडई या पिकासाठी सहभागी होणार्‍या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांना विमा हप्त्यामध्ये ५ टक्के अनुदान देय आहे. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी व मंडळ कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी शेतकर्‍यांनी संपर्क साधावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कोल्हापूरचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारीउमेश पाटील यांनी केले आहे.
   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.